Lok Sabha Election 2024  Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : दक्षिण भारतात 'कमळ' फुलणार का? १२९ जागांवर कोणाची सरशी? वाचा एका क्लिकवर

Lok Sabha Election update : लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आली आहेत. दक्षिण भारताच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा मतमोजणीमुळे उमेदवारांसहित लोकांमध्ये धाकधुक वाढली आहे. देशभरातील लोकसभा मतदारसंघाचे सुरुवातीचे कलम हाती आली आहेत. तर दक्षिण भारतातील १२९ जागांवरील कल देखील आले आहेत. दक्षिण भारतात कमळ फुलणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाच्या ११ वाजताच्या आकडेवारीनुसार, भारतात २९४ आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडी २२५ जागांवर आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा, केरळमध्ये २० जागा, तेलंगणामध्ये १७, आंध्र प्रदेशमध्ये २५ जागा आहेत. कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. कर्नाटकात सकाळी ११ वाजता भाजप १८, काँग्रेस ७ आणि जेडीएस ३ लोकसभेच्या जागेवर आघाडीवर आहेत.

११ वाजताच्या आकडेवारीनुसार, तमिळनाडूमधील ३९ जागांपैकी डीएमके २०, काँग्रेस ८, सीपीआय २, सीपीएम २ जागांवर आघाडीवर आहेत.

केरळमधील लोकसभेच्या २० जागा आहेत. सकाळी ११ वाजताच्या आकडेवारीनुसार, २० जागांपैकी काँग्रेस १३ जागा, इंडियन यूनियन मुस्लिम लीग २, भाजप २ जागांवर आघाडीवर आहे.

तेलंगणामध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. ११ वाजताच्या आकेडवारीनुसार, भाजप ८, काँग्रेस ८, AIMIM १ आघाडीवर आहे.

आंध्र प्रदेशात २५ लोकसभा मतदारसंघ आहेत. ११ वाजताच्या आकडेवारीनुसार, तेलुगू देशम पार्टी जागा, YSRCP 4 आणि भाजप ३ जागांवर आघाडीवर आहे. जनसेना पक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, दिल्लीत ७ लोकसभा मतदारसंघ आहेत. या ७ लोकसभा मतदारसंघात ७ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर गुजरातमधील २६ जागांपैकी २५ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर एका जागेवर इंडिया आघाडी आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT