maharashtra budget session 2026  Saam tv
महाराष्ट्र

विधानसभेत खाणीचा मुद्दा गाजला; ठाकरे आणि राऊत सत्ताधाऱ्यांना भिडले, वनमंत्र्यांकडून एका वाक्यात उत्तर

maharashtra budget session 2026 : विधानसभेत खाणीचा मुद्दा चर्चेत आला आहे. खाणीच्या मुद्यावरून विधानसभेत ठाकरे आणि राऊत सत्ताधाऱ्यांना भिडले.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पावर विधानसभेत चर्चा

नितीन राऊत आणि आदित्य ठाकरेंकडून मुद्दा केला उपस्थित

वनमंत्र्यांनी विरोधकांना दिलं प्रत्युत्तर

चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीचा विषय आज बुधवारी विधानसभेत चर्चेला आला. विधानसभेत काँग्रेसचे आमदार नितीन राऊत आणि ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी खाणीसंदर्भात प्रश्न विचारला. फक्त 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे वाघांचा मार्ग बंद केला जात असेल, तर अशा प्रकल्पाची गरज काय, असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लोहारडोंगरी या आदिवासीबहुल गावाजवळ किर्र जंगलात लोह खनिजाचा साठा आहे. त्याचे उत्खनन करण्यासाठी शासनाने राज्य वन्यजीव अभ्यास मंडळाकडे हा विषय सोपवला आहे. या मंडळाने शासनाच्या बाजूने कल दिलाय. त्यानंतर तो केंद्राच्या राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. या खाणीला पर्यावरणवाद्यांचा सुरुवातीपासून विरोध आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि इतर जंगल क्षेत्रांना जोडणारा मार्ग याच खाण पट्ट्यातून जातो. वर्गासाठी महत्वाचा असा हा कॉरिडॉर आहे. याशिवाय वनसंपदा विपुल आहे. त्यामुळे येथे खाण झाल्यास जंगल आणि वन्यजीवांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती असल्याने पर्यावरणवादी या प्रकल्पास विरोध करीत आहेत. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

आज बुधवारी विधानसभेत याच विषयावर नितीन राऊत आणि आदित्य ठाकरे बोलले. पण हे प्रकरण राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणाकडे आणि न्यायालयात असल्याने शासन त्याची प्रतीक्षा करेल, असे उत्तर वनमंत्र्यांनी दिले. यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी मंत्र्यांचे कान टोचले. एखादी बाब न्यायप्रविष्ट आहे, म्हणून आपण निर्णय घ्यायचा नाही, हे योग्य नाही, असे अध्यक्ष म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune : मुसळधार पावसात भयंकर घटना, पुण्यात खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सोन्याच्या किंमतीवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? DA, HRA, पेन्शन आणि एरिअरबाबत मोठा खुलासा

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! तुमच्या संमतीशिवाय PF कापला जाणार नाही, १८०० रुपये अनिवार्य राहणार

पुण्यातील स्टील व्यापाऱ्याला ५ कोटींची खंडणी... अन् बिश्नोई गँगचा गेम उलटला; राजस्थानमधून मुख्य आरोपी गजाआड!

SCROLL FOR NEXT