locals opposes barsu refinery project demands stopped politics over refinery saam tv
महाराष्ट्र

Barsu Refinery Project : मुख्यमंत्र्यांच्या भेटीस निघालेल्या बारसू रिफायनरी विरोधकांना पाेलीसांनी रस्त्यातच राेखले अन्....

पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन काळात रिफायनरी संघर्ष समितीस दिलेला शब्द पाळला नसल्याचे बारसू विराेधी आंदाेलकांनी म्हटले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Ratnagiri News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde ratnagiri daura) यांना भेटण्यासाठी आम्हांला मज्जाव केला जात आहे. आम्ही शेतकरी आहाेत की आंतकवादी असा प्रश्न पडला आहे. देवाचे काेठणे, साेलगाव आदी ठिकाणी आमची अडवणुक केली गेली. पाेलीसांची गाडी आमच्या मागे फिरत आहे. यामुळे हे सरकार नेमकं काेणाचे आहे हा प्रश्न आता आम्हांला पडला आहे अशा भावना बारसू रिफायनरी विराेधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला. मुख्यमंत्री शिंदे यांना रिफायनरी विराेधाबाबत निवेदन देण्यासाठी चाललेल्या कार्यकर्त्यांना पाेलीसांनी राेखल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेत.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गेली अडीच वर्षे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या बारसू रिफायनरी विराेधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना राजापूर परिसरातील देवाचे गोठणे येथे पोलिसांनी अडविले.

यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन काळात रिफायनरी संघर्ष समितीस मुख्यमंत्र्यांची 15 दिवसांत भेट करुन देऊ असा शब्द दिला हाेता. परंतु आजपर्यंत समितीची भेट झालेली नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजही मुख्यमंत्र्यांना भेटायाला जात असताना प्रशासनाने आम्हांला राेखले आहे. ठीक आहे. आमची माणसं तेथे पाेहचली आहेत. काही झाले तरी माणसं मुख्यमंत्र्यांना भेटणार असेही कार्यकर्त्यांनी, शेतक-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT