Nashik News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : गरम तेलाच्या कढईत पडून चिमुकलीचा मृत्यू, नाशिकमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Nashik News : नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनावणे

Nashik News : गरम तेलाच्या कढईत पडून 6 वर्षांच्या चिमुकलीचा भाजून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी पवार असं मृत मुलीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाद्य पदार्थ विक्रेते समाधान निंबा पवार हे आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते. दरम्यान त्यांचा स्वयंपाकाचं काम संपल्यानंतर त्यांनी गरम तेलाची कढाई खाली उतरून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या कामात ते व्यस्त होते. (Latest Marathi News)

एकीकडे ते कामात व्यस्त असताना त्यांची सहा वर्षाची मुलगी वैष्णवी खेळता खेळता तोल जाऊन गरम असलेल्या तेलाच्या कढाईत जाऊन पडली. मुलगी कढईत पडल्याचं लक्षात येताच समधान यांनी तिला कढाईतून बाहेर काढले. त्यानंतर भाजलेल्या वैष्णवीला त्यांनी स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

वैष्णवी या घटनेत गंभीररित्या भाजली होती. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल या प्रकरणी सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

SCROLL FOR NEXT