
Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिग्रीवरुन देशभरात मोठं वादंग उठलं आहे. आम आदमी पक्ष मोदी यांच्या डिग्रीवरुन आक्रमक झालेला दिसत आहे. मोदींच्या डिग्रीवर आता शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सवाल उपस्थित करण्यात आले आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी दाखवण्यासंबंधीचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यावरून आता देशात राजकारणही सुरू झाले आहे. (Latest Marathi News)
सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, मोदींची जास्तच बदनामी झाली व ती गुजरातच्या न्यायालयाने केली. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण मोदी यांना ''तुमची इयत्ता कंची?'' असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपवण्यासारखे काय आहे? मोदी जी 'डिग्री' दाखवत आहेत ती बनावट आहे.
मुळात यात लपविण्यासारखे काय आहे? मोदी जी 'डिग्री' दाखवत आहेत ती बनावट आहे. गुजरात विद्यापीठाने जी डिग्री मोदींची म्हणून दाखवली त्यावर 'लिपी शैली'त Master लिहिले आहे, पण ती 'लिपी शैली'च 1992 साली आली व मोदींची डिग्री 1983 सालची आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच.
देशाला शिकलेला पंतप्रधान हवा असे बोलणे यात मोदींची अशी काय बदनामी झाली? मोदींकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे व Entire Political Science हा कोणी कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी 'एम. ए.' केले. फक्त ते त्यांची डिग्री दाखवायला तयार नाहीत. आज देश मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी, कृषी कायदे, नोटाबंदी अशा निर्णयांची किंमत चुकवीत आहे.
देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग बरबाद झाला आहे. मोदींचे मित्र 'अदानी' यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशासाठी असे घातक निर्णय पंतप्रधान घेतात की कोणी अनपढ, गंवार मंडळी घेतात? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे आणि अशा सगळ्य़ाच प्रश्नांवर मोदी यांनी त्यांची डिग्री दाखविणे हेच एकमेव उत्तर आहे, मात्र त्याऐवजी ते मौन बाळगत आहेत. या सगळय़ावर उत्तर देण्याची 56 इंची छाती आहे काय? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.