भंडाऱ्यातील जलसंपदा विभागाच्या वसाहतीत बिबट्याचा वावर !  SaamTv
महाराष्ट्र

भंडाऱ्यातील जलसंपदा विभागाच्या वसाहतीत बिबट्याचा वावर !

वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही अनुचित घटना होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : जिल्ह्याच्या पवनी शहरालगत असलेल्या जलसंपदा विभागाच्या वाही वसाहतीत बिबटयाची दहशत पहायला मिळत असून आता चक्क बिबटया घराजवळच आल्याने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाचा जीव टांगणीला लागला आहे.

हे देखील पहा -

वाही येथील जलसंपदा विभागाच्या वसाहतीत तीन विभागीय कार्यालये असून एक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व इतर उपविभाग कार्यरत आहेत. वाही वसाहतीत जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्यासाठी क्वार्टर उपलब्ध असून जवळपास 75 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. मागील जवळपास महिनाभरापासून वाही वसाहत व जवळपासच्या परिसरात बिबट्याची दहशत असून जवळच्या येरवा व शिंगोरी गावात बिबट्याने जनावरे सुद्धा मारली आहेत.

सायंकाळच्या वेळी कर्मचारी व कुटुंबे फिरायला निघाले असता कार्यकारी अभियंता यांच्या निवासस्थानाजवळ तसेच गुणनियंत्रण उपविभागालगत बिबटया दिसून आला होता. वसाहतीतील निवासी कर्मचाऱ्यांच्या निवेदनानूसार वनविभागाने ट्रॅप कॅमेरे वाही वसाहतीत लावले होते, दरम्यान वसाहतीतील कर्मचारी कळमकर यांच्या अंगणात पाळीव कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला करून जखमी केले. वसाहतीतील रहिवास्यांनी आरडाओरड करून बिबट्यास पळवून लावले. आजपर्यंत फक्त दुरुन दिसत असलेला बिबट्या शिकारीच्या शोधात रहिवास्यांच्या घराजवळील अंगणापर्यंत आल्यामुळे वसाहतीतील निवासी दहशतीत असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT