Nagpur forest Department rescue team attempting to capture the leopard that entered a house and injured multiple people. saam tv
महाराष्ट्र

Leopard Rescue Operation: नागपुरातही ऑपरेशन बिबट्याचा थरार, राज्यभरात वाढली बिबट्यांची दहशत

Nagpur Leopard Rescue Drama: हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच नागपूरात बिबट्याच्या ऑपरेशनचा थरार पाहयला मिळाला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कसा थरार रंगला? वनअधिकाऱ्यांनी कसे शर्थीचे प्रयत्न केले? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • बिबट्या जेरबंद झाला तरी त्याची दहशत कमी झालेली नाही.

  • 2 दिवसांपुर्वी बिबट्यासोबत 2 बछडे देखील आढळून आले होते.

  • सरकार बिबट्यांची दहशत रोखण्यात कमी पडतंय

बिबट्याच्या रेस्क्यूचा हा थरार नीट पाहा. नागपूरात पारडी परिसरात एका घरात बिबट शिरला आणि शहरात एकच खळबळ माजली. त्यात या बिबट्यानं तब्बल सहा ते सात जणांवर हल्ला केल्यानं परिसरात एकच दहशत पसरली. त्यानंतर नागपूर वनविभागाच्या अखत्यारीतील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे बचाव पथक घटनास्थळी पोहचले.

परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बघ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली.त्यामुळे बिबट्या आणखीनच बिथरला.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला अचूक डार्ट मारला. मात्र तरीही बिबट्याने तब्बल 15 फूट उंच झेप घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो निपचित पडला आणि त्याला जेरबंद करण्य़ात वनविभागाला यश आलं.

हा बिबट्या जेरबंद झाला तरी त्याची दहशत कमी झालेली नाही. कारण पारडी परिसरात 2 दिवसांपुर्वी बिबट्यासोबत 2 बछडे देखील आढळून आले होते. त्त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भितीचं वातावरण आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची वनमंत्री गणेश नाईकांनी चौकशी केली.

विशेष म्हणजे अधिवेशनाचा दुसरा दिवस बिबट्यांच्या हल्ल्यांवरून गाजला. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी अधिवेशन सुरू असलेल्या उपराजधानी बिबट्यानं धुमाकूळ घातला. त्यामुळे सरकार बिबट्यांची दहशत रोखण्यात कमी पडतंय आणि सध्या केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचं यामुळे पुन्हा एकदा उघड झालंय. त्यामुळे नागरिकांमधील बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलणार का हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaibasa News : ३६ तासांपासून धुमश्चक्री, जवान तुटून पडले, आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

Amazon Layoffs: मोठी बातमी! अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठी नोकरकपात, १४,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूशी हँडशेक, मिठीही मारली...; सामन्यानंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

SCROLL FOR NEXT