leopard attack  saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: मादा बिबटसह दोन बछड्यांनी 36 कोंबडयासह कुत्रा केला फस्त

मादा बिबटसह तिच्या दोन बछड्यांनी 36 कोंबडयासह कुत्रा फस्त केल्याची घटना घडली आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: मादा बिबटसह तिच्या दोन बछड्यांनी 36 कोंबडयासह कुत्रा फस्त केल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर खैरीपट येथील शेतशिवारातील गोठ्यात ही घटना घडली आहे. वेळीच पाशुपालकांनी गोठ्या जवळील घरात आसरा घेतल्याने मनुष्य जीवितहानी टळली आहे (Leopard and two cub hunted 36 chicken and dog at Bhandara).

खैरीपट येथील पशुपालक शुभम भागडकर आपल्या मित्र राकेश दोनाडकरसोबत स्मशानभूमी लगत असलेल्या आपल्या गोठयात दूध काढायला गेले होते. तेव्हा अचानक मादी बिबट (Leopard) आणि तिचे दोन बछडे गोठयात आले. तिला बघून या दोन मित्रांनी गोठ्या शेजारील एका घरात आश्रय घेतला. मात्र, गोठयातील 36 कोंबडयासह कुत्रा मादी बिबट आणि तिच्या दोन बछड्यांनी फस्त केल्या.

याची माहिती संबधित पशुपालकाने गावकऱ्यांनी दिली असता गावकऱ्यांनी फटाके फोडून मादी बिबट आणि तिच्या दोन बछड्यांना हुसकावून लावून त्या दोघांची सुटका केली. मात्र, यात पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुक़सान झाले आहे.

लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या शिरकाव वाढला असल्याने होत असलेले नुकसान बघता वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT