लाळी बु. परिसरात बिबट्या आढळला; नागारिकात भितीचे वातावरण

लाळी बु. परिसरात बिबट्या आढळला; नागारिकात भितीचे वातावरण
Leopards
Leopards saam tv
Published On

लातुर : जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील लाळी (बु) येथील ऊसाच्या फडात बिबट्या आढळून आल्याची चर्चेने ग्रामस्थात भितीचे वातावरण निर्माण झाले. त्या परिसराची पाहणी तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली आहे. (latur news Salivation Leopards were found in the area An atmosphere of fear among the citizens)

Leopards
नागपुरातील तरुणाचा देशी जुगाड; भंगारातून बनविली रेसिंग कार! पहा Video

जळकोट तालुक्यातील लाळी (बु.) परिसरात (Latur News) मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करण्यात आली असून शिवारात २८ जनेवारीला राञी आकरा वाजता या भागातील शेतकरी (Farmer) शेताकडून घराकडे जात होतो. या दरम्यान चंदन पाटील यांच्या शेताजवळ ऊसाच्या फडातून एक अंगावर ठिपके असलेला प्राणी दिसून आला. नक्कीच बिबट्या (Leopards) असल्याचे शेतकऱ्यांना वाटल्याने त्यांनी गावातील कांही लोकांना सांगितले. त्यांच्या व्हिडिओ काढण्यात आला. राञीची उशीरांची घटना असल्याने भिती वाटत असल्याने शेतकरी घाबरुन जाऊन गावाकडे पलायन केले व याबाबत गावात चर्चा केली.

परिसरात पाहणी

याबाबत उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार सुरेखा स्वामी व वनविभाग यांच्या कानावर गेली. लागलीच तहसीलदार यांनी वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांना संपर्क करून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आदेश दिले. शेतकऱ्यांची भेट घेऊन प्राण्याच्या वर्णनबाबत माहीती घेतली. जंगलात बिबट्या असल्याची चर्चा सोशल मिडियाद्वारे व्हिडिओ व्हाँलर झाला असल्याने परिसरात वाऱ्यासारखी घटना पसरल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून माहिती घेऊन सत्य काय आहे हे जाणून घेतले जात आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये; असे आवाहन तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com