Legislative Council Election 
महाराष्ट्र

Legislative Council Election: विधानपरिषदेसाठी आज मतदान, ११ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये लढत; कोणाची पडणार विकेट?

Tanmay Tillu

विधानपरिषद निवडणुकीत 5 उमेदवार उतरवणाऱ्या भाजपने कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारी निशी रिंगणात उतरायचे ठरवलंय. तर 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं फोडाफोडी अटळ आहे. या बेरजेच्या राजकारणात कोणाचा उमेदवार तरणार आणि कोणाचा हरणार याचीच उत्सुकता लागलीय.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 1 अतिरिक्त उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे कोणत्या तरी पक्षाच्या एका उमेदवाराला पराभवाचं तोंड पहावं लागणार.भाजपसह दोन्ही राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार डेंजर झोनमध्ये आहे.त्यामुळे एकेक मत महत्त्वाचं आहे.

एकीकडे विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलीय तर दुसरीकडे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणा-या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविआ आणि महायुतीत जोरदार रस्सीखेच होणार आहे. महायुती आणि मविआचं संख्याबळ किती? निवडून येण्यासाठी लागणा-या मतांचा कोटा किती ? आणि विजयाचं गणित कसं असणार ते पाहूयात.

विधानसभेत कुणाचं किती बळ ?

भाजप + 112

(अपक्ष 9)

शिवसेना शिंदे गट + 46

(अपक्ष 8)

राष्ट्रवादी (AP) + 42

(अपक्ष 2)

महायुती - 200

काँग्रेस - 37

शिवसेना ठाकरे गट - 15

राष्ट्रवादी (SP) - 12

इतर - 5

मविआ - 69

तटस्थ - 5

बविआ - 3

एमआयएम - 2

विधानपरिषदेत कुणाचं गणित बिघडणार?

महायुती

संख्याबळ - 200

उमेदवार - 9

कोटा - 23

एकूण मतांची गरज - 207

कमी असलेली मतं - 07

मविआ

संख्याबळ - 69

उमेदवार - 3

कोटा - 23

एकूण मतांची गरज - 69

दरम्यान कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात उतरलेत पाहूया,

पराभूत होणारा 12 वा कोण?

पंकजा मुंडे

भाजप

परिणय फुके

भाजप

योगेश टिळेकर

भाजप

अमित गोरखे

भाजप

सदाभाऊ खोत

भाजप

भावना गवळी

शिंदे गट

कृपाल तुमाने

शिंदे गट

शिवाजीराव गर्जे

राष्ट्रवादी (AP)

राजेश विटेकर

राष्ट्रवादी (AP)

प्रज्ञा सातव

काँग्रेस

मिलिंद नार्वेकर

ठाकरे गट

जयंत पाटील

शेकाप

12वा उमेदवार रिंगणात उतरल्यानं छोट्या पक्षांना मोठं महत्त्व आलंय. तर भाजपच्या पाचही उमेदवारांची मुख्य भिस्त ही पक्षाकडे असलेल्या 112 मतांवर आहे. भाजपला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरून किमान 3 ते 5 मते खेचून आणावी लागतील. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रणनीती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. विधान परीषद निवडणुकीत कोणाताही दगाफटका नको म्हणून सर्वच पक्ष हॉटेल पॉलिटिक्समध्ये व्यस्त आहेत. मात्र प्रत्यक्ष निवडणूकीत काय घडणार यावरच राज्याच्या राजकारणाचा बॉस ठरणारयं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT