Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांना ६ महिने ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो; श्याम मानव असे का म्हणाले?

shyam manav on eknath shinde : एकनाथ शिंदे यांना ६ महिने ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो, असं वक्तव्य श्याम मानव यांनी केलं आहे. श्याम मानव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Vishal Gangurde

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात जादूटोणा केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वर्षा बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या गंभीर आरोपानुसार,वर्षा बंगल्यात जादूटोण्याचा प्रकार झाला असल्यास एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो, असे प्राध्यापक श्याम मानव यांनी म्हटलं आहे.

वर्षा बंगल्यात जादूटोणा झाल्याच्या आरोप करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवास असलेल्या वर्षा बंगल्यातील लोनमध्ये रेड्यांची शिंग पुरल्याचा आरोप केला आहे. या आरोपावरून प्राध्यापक श्याम मानव यांनी मोठं भाष्य केलं आहे. प्राध्यापक श्याम मानव म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो. पुरोगामी महाराष्ट्राने अंद्धश्रदा विरोधात कायदा दिला. त्याच राज्यात राजकारणी घाबरतात, असे श्याम मानव म्हणाले.

'...म्हणून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे'

'राज्यात जादूटोणा कायदा असून कायद्याच्या विरूद्ध किंवा त्याचा कोणी उल्लंघन करीत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. लोकांमध्ये हिम्मत वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे, असेही श्याम मानव म्हणाले.

'वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरले. त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाही. आजचं सरकारच स्वतः अंद्धश्रदा आहे. अंधश्रद्धाचं समर्थन करतात. अंद्धश्रदा पसरविण्यात त्याचा वाटा आहे, असेही ते म्हणाले. श्याम मानव यांच्या वक्तव्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT