arrest, video viral, yavatmal Saam Tv
महाराष्ट्र

Video Viral : मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गाेळीबार; वडिलांसह एकास अटक

पाेलिसांनी व्हिडीओ पाहताच संबंधितांचा शाेध घेतला.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

Video Viral : यवतमाळ येथील महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे हवेत गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाेलिसांपर्यंत पाेहचला. पाेलिसांनी तपास करुन या प्रकरणी दाेघांना अटक केली आहे. (yavatmal latest marathi news)

महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे मुलीच्या वाढदिवसा निमित्त एका पार्टी सुरु हाेती. या पार्टीत सहभागी झालेल्यांचे चित्रपटाच्या गाण्यावर नाच सुरु हाेता. हा नाच सुरु असतानाच एकाने हवेत गोळीबार केला. त्याचे पार्टीतल्या काहींनी व्हिडीओ चित्रण केले. त्यानंतर ताे व्हिडीओ यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल (video viral) झाला. (Maharashtra News)

हा व्हिडीओ पाेलिसांपर्यंत पाेहचला. त्यानंतर स्थनिक गुन्हे शाखेने (lcb) सव्यद मुसवीर सय्यद जमील (रा. डोंगरगाव) व त्याचा पुसद येथील साथीदार मजहर खान जफरउल्ला खान यांची चाैकशी केली. चाैकशीअंती दाेघे दाेषी आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन जीवंत काडतुस आणि देशी कट्टा जप्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : नागपुरात लग्नसोहळा पार पडताच नवरीने केले मतदान

Maharashtra Live News Update: लोकसभेत 8 डिसेंबर रोजी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षावर आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Mansi Naik Photos: हॉट अन् बोल्ड मानसी नाईक, फोटो पाहून घायाळ व्हाल

SCROLL FOR NEXT