Crime News : क्रिकेट स्पर्धेसाठी गेलेल्या मुलाच्या आईचा गावात झाला खून; पाेलिस तपास सुरु

दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
Crime News, Chiplun
Crime News, Chiplunsaam tv
Published On

- जितेश कोळी

Chiplun News : चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेचा घरात कोणी नसताना अज्ञातांनी तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृत महिला घरामध्ये एकटी असतानाच अज्ञातांनी तिचा खून केला आहे. मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती. (chiplun latest marathi news)

सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. कुलसूम अन्सारी अस मृत महिलेचे नाव असून चिपळूण (chiplun) पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापस सुरू केला आहे. (Breaking Marathi News)

Crime News, Chiplun
Video Viral: 'रानी नहीं है तो क्या हुआ, ये बादशाह आज भी...'; पोलिस ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल, पाटील अटकेत

दरम्यान मृत महिलेचा मुलगा हा आपल्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई फोन उचलत नव्हती. त्यावेळी मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी घाबरलेल्या मित्रांनी तेथून नातेवाईकांचे घर गाठले व सकाळी नातेवाईकांसोबत पुन्हा घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Crime News, Chiplun
Sangli News : डेंग्यूने युवकाचा मृत्यू; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर राेष

यावेळी नातेवाईकांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला अंगावर चादर टाकून झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.

Crime News, Chiplun
Satara Crime News : साताऱ्यातील गुरुवार पेठेत चाेरी; 25 ताेळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला

आज सोमवारी सकाळी या महिलेचा दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथील कब्रस्थानात करण्यात आला. दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी खरा खुनी कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी (police) कसून तपास सुरू केला आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

Crime News, Chiplun
Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांच्या दाै-यानंतर पंचनाम्यासाठी शेतक-यांना मागितले एकरी चारशे रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com