laxman mane & raj thackeray
laxman mane & raj thackeray saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: भावाची समजूत काढा, अन्यथा...! माजी आमदारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

साम न्यूज नेटवर्क

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांचा ठाकरे घराण्यात जन्म झाला असला तरी त्यांचे देशाच्या (india) जडणघडणीत काेणतेही योगदान नाही. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. खरंतर राज ठाकरेंनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) यांच्या विचारसरणीचा आदर्श घेतला पाहिजे असे माजी आमदार 'उपरा'कार लक्ष्मण माने (laxman mane) यांनी येथे (satara) पत्रकार परिषदेत नमूद केले. (raj thackeray latest marathi news)

माने म्हणाले राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे सर्वजण जाणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) राजकीय संवेदनशील परिस्थितीवर एक शब्द देखील बाेलत नाहीत. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा.

भोंगे काढले नाहीत तर आम्ही तलवारी काढू असे वक्तव्य करणा-या राज ठाकरेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा हाेता. मात्र तसं झाले नाही. त्यामुळे मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना आपण भावाची समजूत काढावी अन्यथा घटनात्मक विधिमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्राद्वारे करणार असल्याचे माजी आमदार माने यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT