नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणी (lakhimpur kheri incident) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना जामीन मंजूर करणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा (Allahabad High Court) आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (सोमवार) रद्द केला. (Lakhimpur Kheri Case Latest Marathi News)
उच्च न्यायालयाने अप्रासंगिक विचारात घेऊन आणि पीडितेला सुनावणीचा अधिकार नाकारून हा आदेश दिला असे ग्राह्य धरून न्यायालयाने जामीनाचा (bail) आदेश बाजूला ठेवला आहे. मिश्रा यांना आठवडाभरात आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.
संबंधित बाबी लक्षात घेऊन आणि पीडितेला सुनावणीचा अधिकार दिल्यानंतर गुणवत्तेवर नव्याने निर्णय घेण्यासाठी जामीन अर्ज परत उच्च न्यायालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान पीडितांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार देणे आणि उच्च न्यायालयाने दाखवलेली घाई जामीन आदेश बाजूला ठेवण्यास योग्य आहे. संबंधित आदेश टिकवून ठेवता येणार नाही आणि तो बाजूला ठेवावा लागेल असे खंडपीठाने जामीन रद्द करताना नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.