Laxman hake on Manoj Jarnge Saam TV
महाराष्ट्र

Laxman Hake : छत्रपती संभाजीराजे नाही, मिस्टर संभाजी भोसले औकातीत रहायचं, लक्ष्मण हाके आक्रमक

Laxman Hake : संभाजीराजे छत्रपती यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावरून लक्ष्मण हाके संतापले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झंके, साम प्रतिनिधी

जरांगेंच्या आंदोलनावरुन शिवछत्रपतींच्या वंशजांवर जोरदार टिका होतेय. संभाजीराजें छत्रपतींना यापुढे केवळ संभाजी भोसले बोलणार असल्याचं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. आणि यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच पेटलं. पाहूयात काय झालं .

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले. आज उपोषणाच्या सातव्या दिवशी संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी बोलतांना त्यांनी ओबीसी आंदोलकांना सल्ला दिला आणि इथेच संभाजी राजे छत्रपती आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंमध्ये वादाला सुरुवात झाली.

जरांगे आंदोलना बसले म्हणून पलीकडे आंदोलन करणं हा सुसंस्कृतपणा नाही, हे महाराष्ट्राला शोभत नाही असं म्हणत नाव न घेता संभाजी राजे छत्रपतींनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना सल्ला दिला. तसंच जरांगेंना काही झालं तर सरकार आणि विरोधक जबाबदार असल्याचं म्हणत संभाजीराजेंनी तिसऱ्या आघाडीच्या विरोधकांना धारेवर धरलं.

संभाजीराजेंच्या वक्तव्यानं संतप्त झालेल्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जरांगेंसोबत थेट संभाजीराजे छत्रपतींवर जोरदार आगपाखड केली. यावेळी जरांगें आणि संभाजीराजेंनी औकातीत रहायचं असं म्हणत यापुढे छत्रपती संभाजीराजेंना मिस्टर संभाजी भोसले असं बोलणार असल्याचा निर्वाणीचा इशाराही दिला. तसंच संभाजीराजे हे शाहू महाराजांचे वैचारीक वारस नाहीत अशी टीका हाकेंनी केली. हाकेंनी केलेल्या टिकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

१. रयतेच्या राजाचे वंशजांनी कोणत्याही एका समाजाला पाठींबा देणं हे योग्य आहे का?

२. संभाजीराजेंनी फक्त मराठांचे राजे नसुन मराठे शाहीसह बारा बलुतेदारांचेही राजे असून त्यांनी ओबीसी आंदोलनावर टिका करण्याऐवजी आंदोलकांशी चर्चा का केली नाही?

३. संभाजीराजे छत्रपती जरांगेंच्या भेटीसाठी शिवछत्रपतींचे वशंज म्हणून गेले होते की राजकीय नेते?

४. जरांगेंना काही झालं तर सरकार आणि विरोधक जबाबदार आहेत असं म्हणत संभाजीराजेंनी तिसऱ्या आघाडीसाठी सोयीस्कर राजकारण केलं का?

जरांगेंच्या आंदोलनानं आणि लक्ष्मण हाकेंच्या विधानानं राज्याचं राजकारण तर तापलंच आहे परंतू आता रयतही राजाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करु लागली. हे ही तितकंच खरंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT