Vote counting underway as BJP surges ahead in Latur Zilla Parishad elections, leaving Congress under pressure. saam tv
महाराष्ट्र

Latur Zilla Parishad Election Result: 'अब तक 56' ! लातूरमध्ये काँग्रेसला धक्का; भाजपची मुसंडी, मनसेच्या 'इंजिन'ला गती, जाणून घ्या आतापर्यंतचे सर्व निकाल

Latur ZP Election Results: लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आतापर्यत ५६ जागांचा निकाल लागलाय. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय मिळवण्याचा पाहाला मिळतोय. पण येथे काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिलाय.

Bharat Jadhav

  • लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ५६ जागांचे निकाल जाहीर

  • भाजपची जोरदार मुसंडी, काँग्रेसला मोठा धक्का

  • मनसेच्या कामगिरीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांना मिनी मंत्रालय म्हटलं जातं. यात लातूरमध्ये भाजपनं काँग्रेसला दणका दिलाय. लातूर जिल्हा परिषदेसाठी ५९ जागा, तर १० पंचायत समित्यांमधील ११८ जागांसाठी मतदान झालं. जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून येथे ६४ टक्के मतदान नोंदवण्यात आलं होतं.

लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा काँग्रेसचे अमित देशमुख आणि भाजपचे संभाजीराव निलंगेकर पाटील व अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.

लातूर जिल्हा परिषदेत मनसेने उधळला विजयाचा गुलाल

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लातूर जिल्हा परिषदेत अनपेक्षित यश मिळवलंय. मनसेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळे मराठवाड्यातील राजकारणात मनसेचा प्रवेश झालाय. रेणापूर तालुक्यात पानगाव जिल्हा परिषद गटातून डॉ. सुनील नागरगोजे (मनसे) यांनी विजय मिळवला आहे. तर पंचायत समिती गणातून मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे (दोघी मनसे) यांनी यश मिळवलंय. या विजयामुळे लातूर इंजिन धावू लागलंय.

आता पर्यंतचा निकाल

लातूर जिल्हा परिषद

एकुण जागा-५९/56

भाजप-18

शिवसेना-01

राष्ट्रवादी-11

ठाकरे गट-01

शरद पवार गट -01

काँग्रेस-21

मनसे -01

अपक्ष -02

इतर-

एकूण = 56

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Liver Health: लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढेल हा लाल रंगाचा ज्यूस, सकाळी उपाशीपोटी नक्की प्या

Abhishek Banerjee : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याच्या घरी पोलिसांची धाड, तब्बल ५ तास सुरु होता तपास

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या; मोदी सरकारने घेतलेले 'हे' ३ मोठे निर्णय जाणून घ्या

Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा बदल, प्रति तोळा किती रूपयांना मिळणार? पाहा ताजे दर

SCROLL FOR NEXT