Electric Shock 
महाराष्ट्र

Latur: कपडे वाळत घालताना शॉक लागला अन् जागीच मृत्यू; पण विवाहितेच्या घरच्यांना वेगळाच संशय

Woman Dies After Electric Shock: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आष्टा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. अर्पिता गौरव शेळके या नवविवाहित तरुणीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहित महिलेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. महिला आधी घरात कपडे वाळत घालत होती. या दरम्यान, तिला विजेचा तीव्र धक्का बसला. लगेचच तिला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेबाबत तिच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करत सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अर्पिता गौरव शेळके (वय २१) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. पुण्यातून गावी इंजिनिअरिंगची परीक्षा देण्यासाठी आली होती. प्राथमिक माहितीनुसार, अर्पिता घरात कपडे वाळवत असताना तिला विजेचा तीव्र धक्का बसला. लगेचच तिला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं.

या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या मंडळींनी रूग्णालयात धाव घेतली. दरम्यान, तिच्या नातेवाईकांनी मृत्यूवर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे काही कारण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात चाकूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत असून, दोन्ही बाजूने चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध अंगाने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT