Earthquake In Latur Saam Tv
महाराष्ट्र

Latur: लातूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, रात्री अचानक जमीन हादरली; सगळेच घराबाहेर पडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake In Latur: लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले. नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. लातूरमध्ये २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य भूकंपाचे धक्के बसले

Priya More

Summary -

  • भूकंपाच्या धक्क्याने लातूर पुन्हा हादरले.

  • लातूरमध्ये २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य भूकंपाचे धक्के बसले.

  • सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • प्रशासनाकडून घाबरू नका पण सतर्क राहा असे आवाहन करण्यात आले.

भूकंपाच्या धक्क्याने लातूर हादरले. लातूरच्या बडूर, उस्तुरी गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. २.४ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली आहे. बुधवारी मुरुड आकोला इथे देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भूंपाचे धक्के जाणवले. २.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. कलबुर्गी, लापूर, नांदेड आणि लातूर या ठिकाणच्या भूकंप मापक यंत्रावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर २.४ रिश्टर स्केल या सौम्य भूकंपाची नोंद आढळून आली.

तर कालच लातूरच्या मुरुड अकोला गावात देखील २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १९९३ साली झालेल्या किल्लारी भूकंपाची पुनरावर्ती होती की काय? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. मात्र दोन्ही भूकंपाचे धक्के हे सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा, एकोणा गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याचा केंद्रबिंदू भूकंप अॅपवर दाखवला गेला असून तीव्रता ३.२ रिश्टर स्केल एवढी आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र कोणत्याही प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात स्फोट घडवले जातात. याचाच हा धक्का असावा, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वकीलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

Shivali Parab : "वेड तुझे..."; शिवाली परबचा 'तो' VIDEO पाहून बॉलिवूड अभिनेत्यानं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT