लातूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली.
धाराशिव, पुणे मार्गे लातूर-मुंबई जोडणी होणार.
प्रवासात ३ ते ४ तासांची बचत होणार.
प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध.
Mumbai–Latur Vande Bharat Express Soon : लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लातूर-पुणे-मुंबई वंदे भारत एकस्प्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिवमधून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक मोठ्या प्रमाणात आहे. पण रेल्वेची संख्या मर्यादीत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण वंदे भारत एक्सप्रेसमुळे धाराशिव आणि लातूरकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहेच. त्याशिवाय वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विनले जात आहे. नागपूर-पुणे एक्सप्रेस नुकतीच सुरू झाली आहे. त्यात आता आणखी एका एक्सप्रेसची भर पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनेक वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्ब्यांची संख्या आणि विस्तार केला जात आहे. लातूरहून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवासही करता येणार आहे. लातूर-धाराशिवकरांना मुंबई गाठणे अधिक सोयीचे होईल.
लातूर, धाराशिव ही दोन शहरे आता पुणे आणि मुंबईला जोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मागणी केली जात होती. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून वारंवार वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली जात होती. या मागणीला यश मिळाले असून रेल्वेकडून लातूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली आहे. लातूर, धाराशिवमधून पुणे,मुंबईला जाण्यासाठी मोजक्याच रेल्वे उपलब्ध आहेत. पण आता वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्यामुळे लातूर-धाराशिवकरांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.
लवकरत लातूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही ट्रेन लातूरहून सुटेल, त्यानंतर धाराशिव, कुर्डूवाडी, दौंड, पुणे,कल्याण, ठाणे, दादरमध्ये वंदे भारत थांबणार आहे. मिळालेल्या माहितीनुसाप, लातूरसाठी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीवरून सकाळी ६ वाजता निघेल आणि दुपारी दीड वाजता लातूरमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. मुंबईहून लातूरला फक्त सात ते आठ तासात पोहचणार आहे. लातूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केल्यास तीन ते चार तास वाचणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.