Latur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Latur Crime News: डोळ्यात मिरचीचं पाणी फेकत लाथाबुक्क्यांनी बेदम चोप; कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या मनोरुग्णाला अखेर अटक

Latur Psychopath arrested: मनोरुग्णाला पकडताना दोन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्याला अटक केलीये.

Ruchika Jadhav

Latur Crime News: लातूर इथल्या बोरफळ गावात गेल्या तीन दिवसांपासून मनोरुग्णाची दहशत पाहायला मिळत आहे. अखेर रविवारी या मनोरुग्णाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. मनोरुग्णाला पकडताना दोन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्याला अटक केलीये. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोरुग्ण तरुणाला पकडतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. या व्हिडिओमध्ये मनोरुग्ण हातात कोयात घेऊन धावत येत आहे. तो येत असताना एक जण त्याच्या अंगावर लाल मसाल्याचं पाणी फेकतो.

मसल्याचं पाणी पडल्याने मनोरुग्ण खाली पडतो. यावेळी आणखीन एक तरुण त्याच्या दिशेने काठी घेऊन धावतो. यावेळी सर्वजण मिळून या मनोरुग्णाला बेदम चोप देतात. अखेर ५ तासभर प्रयत्नानंतर दोन तरुणांनी धाडस दाखवून मनोरुग्णाला पकडले आहे. त्या नंतर पोलिसांनी मनोरुग्णला जेरबंद केले आहे. त्यानंतर नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडलाय.

गेल्या तीन दिवसांपासून हातात कोयते घेऊन हा मनोरुग्ण बोरफळ परिसरात दहशत माजवत होता. त्याने तीन व्यक्तींवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं. जवळपास 25 पोलीस 5 तासापासून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते.

पण त्यांच्या अंगावर तो धाऊन जायचा. शेवटी दोन तरुणांनी धाडस दाखवत त्याला पकडलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेत मनोरुग्णाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आतापर्यंत या मनोरुग्णाने तिघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केलाय. गेल्या पाच तासांपासून पोलीस या मनोरुग्णाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होते. मनोरुग्ण हातात कोयता घेऊन बोरफळ गावच्या चौकात उभा रहायचा आणि चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करायचा. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

SCROLL FOR NEXT