Water Scarcity in Maharashtra's Latur District; Water Supply in Rural Areas After 15 Days Saam TV
महाराष्ट्र

Latur Water Crisis: लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक गडद; ग्रामीण भागात १५ दिवसांनी पाणी पुरवठा

Water Crisis in Maharashtra's Latur Area: कमी पावसामुळे राज्यातील सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पाण्याची समस्या अधिक बिकट बनली आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले
लातूर
: लातूर जिल्ह्याला दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता अधिक भीषण होत चालली आहे. जिल्ह्यात असलेल्या प्रकल्पांपैकी जवळपास निम्मे प्रकल्पात पाणीच शिल्लक राहिलेले नाही. यामुळे पाण्याची समस्या अधिक भीषण झाली आहे. प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने ग्रामीण भागात अधिक समस्या असून १५ दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जात आहे. 

कमी पावसामुळे राज्यातील सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पाण्याची समस्या अधिक बिकट बनली आहे. (Water Scarcity) धरण व प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाण्याची तहान भागविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. अनेक भागात मार्च महिन्यातच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची समस्या अधिक गडद झाली आहे. (Latur) लातूर जिल्ह्यात याचा अधिक परिणाम पाहण्यास मिळत आहे.

लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ८ मध्यम प्रकल्पांपैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर चार मध्यम प्रकल्पात केवळ 2 ते 4 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला. जिल्ह्यातल्या अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) केला जात आहे. तर सद्या ग्रामीण भागात १५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. हे पाणी पुरत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT