Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : कोट्यवधींची योजना पाण्यात; लातूर जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या

Latur News : लातूरच्या उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायतीअंतर्गत ९८ गावे व सहा वाडी-तांडे अशी १०४ गावांची संख्या आहे. जवळपास सर्वच गावांना जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे

Rajesh Sonwane

लातूर : गावात पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. त्यावर निधीही खर्च झाला. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे योजनांचे पाणी गेले कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. 

गावागावांमध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पाणी पुरवठा योजनांचे काम करण्यात येत असते. त्यानुसार लातूरच्या उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायतीअंतर्गत ९८ गावे व सहा वाडी-तांडे अशी १०४ गावांची संख्या आहे. जवळपास सर्वच गावांना जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. यातील बहुतांशी गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असून, काही गावांची कामे लवकर सुरू होणार आहेत. 

पाणीपुरवठा योजनांचे स्रोत आटले 

असे असले तरी यावर्षी पाऊस कमी असल्याने पाणीपुरवठा योजनांचे स्रोत ज्या ठिकाणी आहेत. तेथेच पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या गावांमध्ये पाणी योजना राबविण्यात आल्यानंतर देखील प्रशासनासमोर पाणी पुरवठ्याचे तगडे आव्हान असणार आहे. अर्थात कोट्यवधींच्या योजना राबविल्यानंतर देखील पाणी कधी मिळणार?, टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांची प्रशासनाकडे आस आहे. 

हिंगोलीतही भीषण टंचाई 

हिंगोली शहरात सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील १७ जलकुंभांतून नळ योजनेद्वारे पुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या पाहता या जलकुंभातून विविध गल्ल्यांमध्ये पाणी सोडताना अपूर्ण पडत आहे. यामुळे काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होत आहे. यामुळे शहरात जलकुंभांची संख्या वाढल्यास पाणीपुरवठा व्यवस्थित होणार असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT