एसटी  
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; आंदोलकांना हुसकावल्‍यानंतरचा प्रकार

एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; आंदोलकांना हुसकावल्‍यानंतरचा प्रकार

दीपक क्षीरसागर

लातुर : जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण घेत आहे. जिल्ह्यात बुधवारी (३ ऑक्‍टोंबर) दोन ठिकाणी आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटना ताज्या असताना आज औसा येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र अन्‍य कर्मचाऱ्यांनी त्‍यास झाडावरून उतरविल्‍याने प्रयत्‍न अयशस्‍वी झाला. (latur-news-ST-employee-attempted-suicide-The-type-after-the-eviction-of-the-protesters)

औसा येथे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी काही वेळापूर्वी भेट दिली होती. आंदोलक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाई करावी लागेल असा इशारा दिला. यावेळी औसा आगारातून दोन बसेस मार्गस्थ झाल्या. दरम्यान हा बंद बेकायदेशीर असून आगराच्या जागेत आंदोलन करता येणार नाही असे सांगत त्यांना एक तर कामावर या किंवा बाहेर जा; असे बजावण्यात आले. एकुणच परिस्थितीला कंटाळून चालक रमाकांत जेवळीकर यांनी कंटाळून झाडावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने दोरी घेऊन चढला होता.

कर्मचारींना हुसकावून लावल्‍यानंतरचा प्रकार

औसा येथील आगारात कर्मचारी आंदोलन करत असताना त्‍यांना आगारातून हुसकावून लावले होते. यानंतर आत्‍महत्‍येचा प्रकार झाला. यावेळी आगार प्रमुख गायकवाड आणि अन्य आंदोलकांनी समजावून सांगितले. अखेरीस त्याला झाडावरून खाली घेण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

Film Festival: ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार सन्मान

Maharashtra Live News Update: पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का

Saree Ironing : लॉन्ड्रीचे पैसे वाचवा, घरीच करा इस्त्री; सुरकुत्या जाऊन साडी दिसेल नव्यासारखी

Kokan Tourism: कोकणात बीच फिरून कंटाळलात? मग या ५ ऐतिहासिक किल्ल्यांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT