Surabhi Jayashree Jagdish
कोकणातील किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारशक्तीचे, दूरदृष्टीचे आणि समुद्रनियंत्रणाच्या धोरणाचे जिवंत पुरावे आहेत. अरबी समुद्राच्या काठावर उभारलेले हे किल्ले शत्रूच्या आरमारी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोकणातील किल्ल्यांची साखळी उभी करण्यात आली होती. जर तुम्ही सिंधुदुर्गात फिरायला जात असाल तर तुम्ही कोणत्या किल्ल्यांना भेट दिली पाहिजे ते पाहूयात.
हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी उभारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः लक्ष घालून तो बांधला. समुद्री संरक्षण, गुप्त दरवाजे आणि मजबूत तटबंदी यासाठी प्रसिद्ध आहे.
विजयदुर्ग हा स्वराज्याचा प्रमुख आरमारी किल्ला होता. याठिकाणी मोठ्या जहाजांची दुरुस्ती करण्याची सोय होती. समुद्रावर वर्चस्व ठेवण्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता.
देवगड बंदराच्या संरक्षणासाठी हा किल्ला होता. समुद्र आणि जमिनीवरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवणं सोपं होतं. आजही येथून दिसणारा समुद्रदृश्य पर्यटकांना आकर्षित करतो.
पोर्तुगीजांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतगड उभारला गेला. हा किल्ला रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. कोकण किनारपट्टीवरील संरक्षण साखळीत त्याचा मोठा वाटा होता.
मालवण बंदराजवळील हा किल्ला समुद्री व्यापारावर नियंत्रणासाठी होता. स्वराज्याच्या आरमाराला सुरक्षित आश्रय देणं हे त्याचं काम होतं. आज किल्ल्याचे अवशेष इतिहासाची साक्ष देतात.