Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांची रात्री उशिरापर्यंत सभा, ११ जणांवर गुन्हा दाखल; लातूरमध्ये मराठा बांधव आक्रमक

Manoj jarange Patil Sabha: लातूरच्या रेनापुर येथे मनोज जरांगे यांची २२ डिसेंबर रोजी सभा पार पडली. ही सभा रात्री उशिरा घेतल्यामुळे ११ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

संदीप भोसले, लातूर| ता. २६ डिसेंबर २०२३

Maratha Reservation Protest:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून लाखो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा सरकारला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ट्रॅक्टर चालकांना आंदोलनात सहभागी न होण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या होत्या. लातूरमधूनही असाच प्रकार समोर आला असून मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूरच्या (Latur) रेनापुर येथे मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांची २२ डिसेंबर रोजी सभा पार पडली. ही सभा रात्री उशिरा घेतल्यामुळे ११ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल करण्यात आला असल्याचा आरोप मराठा बांधवांनी केला आहे. यापूर्वी देखील अनेक राजकीय नेत्यांच्या उशिरापर्यंत सभा झाल्यात, मात्र त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. असा आरोप मराठा समाजाकडून केला जातोय. या संदर्भात उद्या रेनापुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत धडकणार मराठा बांधव..

दरम्यान, २० जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. मुंबईतील आंदोलन हे सर्वात मोठे असेल. सर्व कामे आटोपून मुंबईत धडक द्यायची आहे. आता न्याय दिल्याशिवाय माघारी परतणार नाही.. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT