Latur Farmer Ended Life:  Saamtv
महाराष्ट्र

Latur News: हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात गेला, ५५ वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं; लातुरमधील दुर्दैवी घटना!

Gangappa Pujari

संदीप भोसले, लातूर|ता. २८ सप्टेंबर

Latur Farmer Death News: गेल्या आठवडाभरापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पीक मातीमोल झालं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका लातूर जिल्ह्याला बसला असून सोयाबीनचे मोठे नुकसान झालं आहे. अशातच हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आलं आहे.

यंदा राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. पेरण्या देखील वेळेवर झाल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र मागील चार दिवसाखाली लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं प्रचंड मोठ नुकसान झाल आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. अशातच लातूरच्या निलंगा तालुक्यातील चांदोरी येथील शेतकरी प्रभू गाडीकर (वय 55 वर्ष) या अल्पभूधारक शेतकऱ्यांने स्वतःच्याच गोठ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.

सततची होणारी नापिकी त्यात केवळ दीड एकर शेती, स्वतःचा मुलगा दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर.. या सगळ्या संकटावर मात करत कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा,, या विवंचनेत त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलायची माहीत समोर येत आहे. प्रभू गाडीकर यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांना शासनाने मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सलग चार दिवस पावसाने झोडपले होते. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गंगापूर तालुक्यातील कायगाव परिसरात सतत होत असलेल्या अतिवृष्टी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.सध्या वेचणी आलेला कापूस पावसाने भिजल्याने त्याच्या वाती होऊन माती झाली आहे. शेत शिवार जलमय झाली आहेत, सर्वत्र पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अय्यो! तब्बल ६० लाख पगार, तरीही पुरत नाही, तरुणीने दुःख सांगितलं, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया| VIDEO

SL vs NZ 2nd Test: श्रीलंकेची आघाडी 500 पार.. न्यूझीलंडचा अवघ्या 88 धावांवर पॅकअप

Maharashtra News Live Updates: रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा प्रणिती शिंदे यांनी केला दावा

IAS Ayush Goyal : २८ लाखांची नोकरी सोडली, जिद्दीने UPSC ची तयारी, एका झटक्यात IAS झाला; आयुष गोयलची सक्सेस स्टोरी वाचाच

Chakli Recipe : कुरकुरीत आणि कमी तेलात फुलणारी चकली; वाचा परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT