Rena Project Latur  Saam tv
महाराष्ट्र

Latur Rain : संततधार पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात २ टक्के पाणीसाठा वाढला

Latur News : गतवर्षी चांगला पाऊस न झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवली. राज्यभरात हि स्थिती होती. मात्र आता पाऊस सुरु झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न काही अंशी कमी झाला आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले

लातूर : राज्यात मान्सूनचे सुखद आगमन झाले आहे. राज्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस होत असून यामुळे नदी, नाल्यात पाणी आले आहे. हे धरणात जात असल्याने पाणी साठा वाढण्यास मदत होत आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील रेणा मध्यम प्रकल्पात गेल्या ४ दिवसापासून झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू झाल्याने पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.

गतवर्षी चांगला पाऊस (Rain) न झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवली. राज्यभरात हि स्थिती होती. मात्र आता पाऊस सुरु झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न काही अंशी कमी झाला आहे. बीड, संभाजीनगर, (Latur) लातूर, अकोला जिल्ह्यात मागील दोन दिवसात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. यामुळे धरणात देखील पाण्याची आवक होण्यास सुरवात झाली आहे.  

दरम्यान सोमवारी संध्याकाळपर्यंत धरण साठ्यात २ टक्के पाणीसाठा वाढला आहे. प्रकल्पात सद्यस्थितीला ३.४० दलघमी एवढा जलसाठा वाढला आहे. तर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणखीनही पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाणीपातळी आणखीन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे या धरण परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT