Fraud  Saam tv
महाराष्ट्र

Latur : तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा दुरुपयोग, फसवणूक प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गिरवलकर नगर येथे राहणाऱ्या शेख अन्सार मन्सूर यांनी तक्रार दाखल केली.

दीपक क्षीरसागर

लातूर - तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी लातूर (Latur) मध्ये 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर येथील एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात याप्रकरणी गिरवलकर नगर येथे राहणाऱ्या शेख अन्सार मन्सूर यांनी तक्रार दाखल केली. (Latur Latest News In Marathi)

प्रशांत भागवत ईरलापल्ले यांच्या कडून त्याने 100 दिवसात परत करण्याच्या अटीवर 6 लाख रुपये घेतले होते. त्यासाठी तारण म्हणून जनता सहकारी बँक लातूर शाखेचे धनादेश स्वाक्षरी करून कोरे दिलेले होते. सोबतच 100 रुपयांचा कोरा बॉन्ड पेपर दिलेला होता. सहा लाख रुपये परत केले परंतु तारण म्हणून दिलेले चेक, बॉन्ड त्यांनी परत दिलेच नाहीत. (Tajya News)

प्रशांत भागवत ईरलापल्ले, पिराजी माणिक मेकले, चेतन तुकाराम आकनगिरे, हरिओम शरदराव भगत यांनी संगनमत करून त्याचा दुरुपयोग केला. 10 लाख रुपये येणे आहे अशी नोटीस त्यांनी पाठवून दिली. तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT