Farmer Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Farmer Rasta Roko : दुष्काळी अनुदान, पिक विमा रक्कमेसाठी शेतकरी आक्रमक; लातूर अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको

Latur News : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही दुष्काळी अनुदान आणि पिक विम्याची रक्कम मिळाली नाही.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात आले होते. शिवाय पिकांच्या नुकसानीनंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून या विरोधात शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लातूर (Latur) जिल्ह्यातील रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे,. मात्र तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही दुष्काळी अनुदान आणि पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी (farmer) महामार्ग आडवत सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली आहे. तर यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गेल्या एक तासापासून रास्ता रोको आंदोलन देखील केले आहे. 

वाहनांच्या लांबच लांब रांगा

लातूरच्या रेणापूर फाटा येथे आज लातूर- बीड महामार्गावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १ तास रास्ता रोको आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांनी महामार्ग अडविल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

SCROLL FOR NEXT