Udgir Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; उदगीर परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या

Latur News : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, धरणात पाणी साचले नाही. धरणात असलेला पाणी साठा वाढत्या उन्हामुळे देखील बाष्पीभवन होऊन कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

संदीप नागरे

लातूर : राज्यातील बहुतांश भागात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाईची भाषण समस्या निर्माण झाली आहे. आता (Latur) लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तलावात देखील पुढील आठ दिवस पुरेल इतकाच जिवंत पाणी साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील काही दिवसात या भागात देखील पाणी टंचाईची (Water Scarcity) समस्या भेळसावणार आहे. (Maharashtra News)

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी (Rain) पाऊस झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, धरणात पाणी साचले नाही. धरणात असलेला पाणी साठा वाढत्या उन्हामुळे देखील बाष्पीभवन होऊन कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे बहुतांश भागात मार्च महिन्यातच पाण्याची समस्या (Water Crisis) जाणविण्यास सुरवात झाली आहे. यानंतर आता (Udgir) उदगीर तालुक्यात देखील पाणी टंचाईचे संकट उभे आहे. अवलकोंडा तलावातील पाणीसाठा कमी होत असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

दरम्यान तलावात पाणीसाठा कमी असताना देखील तलावातील पाणी मोटारीने उपसा केल्याने तलाव कोरडा होत चालला आहे. यामुळे येत्या काळात नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तलाव कोरडा होत चालला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

SCROLL FOR NEXT