Ghatkopar Landslide: साखरझोपेत असताना काळाचा घाला, मुंबईमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Ghatkopar Gausia Chawl Landslide: घाटकोपरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. ३ ते ४ घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला.
Ghatkopar Landslide: साखरझोपेत असताना काळाचा घाला, मुंबईमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
Ghatkopar Landslide UpdateSaam Tv
Published On
  • घाटकोपरमध्ये दरड कोसळली

  • एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

  • घाटकोपर पश्चिमेच्या चिरागनगर भागातील घटना

  • मुसळधार पावसामुळे चाळीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली

मुंबईतील घाटकोपर येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक ३ ते ४ घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिम येथील चिरागनगर परिसरातील गौशिया चाळीवर दरड कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना ३ ते ४ घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुरूवातीला २ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलिस, वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मध्यरात्रीपासून घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत ३ ते ४ घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत जाहीर केली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या सूचना दिल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने पावसापूर्वी नागरिकांना तिथून दुसरीकडे राहायला जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मनपानं नोटीस देऊनही नागरिकांनी दुर्लक्ष केले असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com