Manasvi Choudhary
उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे वयोवृद्धच नाही तर तरूणांना देखील उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या घडीला मोठ्या संख्येने तरूण या आजारांशी सामना करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. अनेकांना या आजारांची मुख्य लक्षणे माहित नाही. अनेकदा आजार होऊनही ही लक्षणे दिसत नाही.
या आजारांची लक्षणे दिसत नसली तरी वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे. नाहीतर मोठे संकट भोगावे लागू शकते.
हे आजार शरीरात हळूहळू वाढतात. पण व्यक्तीच्या दैनंदिन कामांवर परिणाम करत नाही त्यामुळे वेळीच आरोग्याची तपासणी करणे महत्वाचे आहे.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार दोन्हीही तुमच्या जीवनशैलीशी संबंधित आजार आहे.
जे लोक व्यायाम करत नाही. तसेच तेलकट, तिखट, जंकफूडचे सेवन करतात, ज्यांचे वजन जास्त आहे, जी व्यक्ती सतत तणावाखाली असते, पुरेशी झोप घेत नाही अश्यांना या आजारांचा धोका अधिक असतो.
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची लक्षणे वेळीच लक्षात येत नाही मात्र ती ओळखणे महत्वाचे आहे. सुरूवातील आरोग्यात कोणताही फारसा बदल दिसणार नाही.
मात्र हे आजार हृदय, मूत्रपिंड, मेंदू आणि डोळे या शरीराच्या भागांवर परिणााम करू शकतात. योग्य वेळी उपचार न केल्याने हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचे आजार, दृष्टी जाणे या समस्या उद्भवू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.