Suresh Navale News : महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपने वेठीस धरलंय; शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री सुरेश नवले यांचा आरोप

Beed News : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून जागा वाटपाचे काम केले जात आहे. यात सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीत जागा वाटपावर खल सुरु आहेत.
Suresh Navale
Suresh NavaleSaam tv
Published On

बीड : भाजपाकडून वेगवेगळ्या रिपोर्टचा आधार देऊन सद्यस्थितीत असणाऱ्या खासदारांना प्रयत्न (Beed) करून देखील त्यांना वेटीस धरले जात आहे. भाजपने महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाला वेठीस धरल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. (Tajya Batmya)

Suresh Navale
Nashik News : महापालिकेची पाईपलाईन फुटल्याने शेतकऱ्याचे नुकसान; काढणीला आलेला कांदा भुईसपाट

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) जोरदार वारे वाहत असून जागा वाटपाचे काम केले जात आहे. यात सध्या (BJP) भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीत जागा वाटपावर खल सुरु आहेत. या जागा वाटप करण्यावरून भाजप शिवसेना शिंदे गटाला वेठीस धरले जात असल्याचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी म्हटले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Suresh Navale
Mira Bhayandar News : गांजा विक्री प्रकरणात दोन जणांना अटक; १ लाखाचा मुद्देमाल जप्त

त्यावेळी भाजप काय करेल 

मोठ्या विश्वासाने सर्व राजकीय आयुष्य पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी मिळण्यासाठी जीवाच्या अंतकरणाने प्रयत्न करत आहेत. तरी देखील भाजपाकडून वेगवेगळ्या रिपोर्टचा आधार देऊन सद्यस्थितीत असणाऱ्या खासदारांना प्रयत्न करून देखील त्यांना वेटीस धरायचे काम भाजप करीत आहे. त्यामुळे १२ जागांसाठी भाजपची ही नीती असेल तर विधानसभेमध्ये २८८ जागा आहेत. त्यावेळेस भाजप काय करेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे भाजपने वेळीस सावध व्हावे, अन्यथा महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांना माफ करणार नसल्याचा इशारा देखील सुरेश नवले यांनी दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com