Nashik News : महापालिकेची पाईपलाईन फुटल्याने शेतकऱ्याचे नुकसान; काढणीला आलेला कांदा भुईसपाट

Nashik News : यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. अशा स्थितीत देखील शेतकऱ्यांनी कसेतरी पिकांची लागवड करत उत्पादन घेतले आहे.
Nashik News
Nashik NewsSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या मालेगाव शहराला गिरणा धरणातून पाईपलाईनच्या माध्यमातून (Nashik) पाणी पुरवठा केला जातो. मात्र १ एप्रिलला रात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने ते पाणी जवळच असलेल्या कांद्याच्या शेतात गेले. यामुळे मातीसकट (Onion) कांदा भुईसपाट झाला आहे. (Latest Marathi News)

Nashik News
Wardha News : वर्धेत निवडणुक विभागाच्या कामावरील गाडीवर कमळाचे चिन्ह; ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार

यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. अशा स्थितीत देखील शेतकऱ्यांनी कसेतरी पिकांची लागवड करत उत्पादन घेतले आहे. नाशिक (Malegaon) मालेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात (Onion Crop) कांदा उत्पादन घेतले जात असून आता कांदा काढणीला आला आहे. दरम्यान मालेगाव शहराला (Girna River) गिरणातून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन रात्रीच्या सुमारास फुटून गेली. दहिवाळ गावाजवळ भूमिगत पाईप लाईन फुटल्याने ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik News
Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

दीड एकरातील कांद्याचे नुकसान 

या शिवाय पाइप लाइनमधील वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. सर्व पाणी बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे मातीसकट दिड एकरातील कांदा भुईसपाट झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून महापालिकेने त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी  संबंधित शेतकऱ्यानी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com