Onion Price : कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण; सोलापूर बाजार समितीतील चित्र

Solapur News : हिवाळ्यात लागवड करण्यात आलेल्या कांद्याच्या काढणीला आता सुरवात झाली आहे. मार्केट येणार कांदा हा रांगडा कांदा म्हणून ओळखला जातो. हा कांदा टिकत असल्याने घरात साठवून ठेवता येत असतो.
Onion Price
Onion PriceSaam tv

सोलापूर : नवीन कांदा काढणीला सुरवात झाली असल्याने मार्केटमध्ये कांदा येण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून दरात मात्र घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. (Maharashtra News)

Onion Price
Buldhana News : बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा! एलसीबीची कारवाई, ३१ हजार लिटर साठ्यासह ३४ लाखांचा मुद्धेमाल जप्त

हिवाळ्यात लागवड करण्यात आलेल्या कांद्याच्या काढणीला आता सुरवात झाली आहे. मार्केट येणार कांदा हा रांगडा कांदा म्हणून ओळखला जातो. हा कांदा टिकत असल्याने घरात साठवून ठेवता येत असतो. यामुळे याची मागणी देखील मोठी असते. सध्या या कांद्याची काढणी सुरु झाली असून शेतकऱ्यांकडून (Farmer) मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणला जात आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून मोठ्या संख्येने सोलापुरात येत आहे. यामुळे बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Onion Price
Water Shortage : मराठवाड्यातील ६०० पेक्षा अधिक गावे अजून तहानलेलीच; टँकरची संख्या पोचली ७०० च्या वर

४०० गाड्यांची आवक 
सोलापूर बाजार समितीमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते. यामुळे जवळपास ४०० गाड्यांची आवक झाली आहे. परिणामी दरात घसरण झाली असून सध्या १४०० ते १५०० रुपये प्रतीक्विंटल मिळत आहे. यात निर्यातबंदी अनिश्चित कालावधीसाठी वाढवल्याने कांद्याचे दर घसरल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com