Wardha News : वर्धेत निवडणुक विभागाच्या कामावरील गाडीवर कमळाचे चिन्ह; ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार

Wardha News : वर्धेत शरद पवार उपस्थित राहणार आहे. या सभेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून वेगवेगळे पथक बनवून वाहने पाठविण्यात आली आहे.
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास 

वर्धा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. याचे पालन केले जात असून वर्धा येथे निवडणूक (Wardha) विभागाच्या कामावरील वाहनावरच कमळाचे चिन्ह असल्याचे समोर आले आहे. वाहनावर कमळाचे चिन्ह दिसताच शिवसेना ठाकरे गटाकडून (Police) पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. (Maharashtra News)

Wardha News
Electric Shock : घरी कोणी नसताना घडले अघटीत; विजेच्या जोरदार झटक्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू


वर्धेच्या रामनगर परिसरात हे वाहन कार्यरत होते. वर्धेत आज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. या अर्ज भरण्यासाठी निघणाऱ्या नामांकन रॅलीसाठी वर्धेत शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहे. या सभेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून वेगवेगळे पथक बनवून वाहने पाठविण्यात आली आहे. यापैकी निवडणूक विभागाच्या एका वाहनावर चक्क कमळाचे स्टिकर असल्याचे (Shiv Sena) ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिसून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Bhadgaon Crime News : प्रियकराच्या मदतीने पत्नीचे भयानक कृत्य; पतीच्या अपघाताचा केला बनाव

निवडणूक विभागाच्या वाहनावरच चिन्ह असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त होत थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठले.  याबाबत तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आशिष पांडे याबाबत तक्रार केली असून आदर्श आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com