Bhadgaon Crime News : प्रियकराच्या मदतीने पत्नीचे भयानक कृत्य; पतीच्या अपघाताचा केला बनाव

Jalgaon News : ३१ मार्चला पळासखेडे-तळवाडे रस्त्यावर किशोर पाटील हे मृतावस्थेत आढळले. त्यांचा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाजानुसार भडगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली
Bhadgaon Crime News
Bhadgaon Crime NewsSaam tv

जळगाव : पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचा धक्कादायक (Jalgaon) प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने हे भयानक कृत्य केले आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पत्नीला अटक करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

Bhadgaon Crime News
Electric Shock : घरी कोणी नसताना घडले अघटीत; विजेच्या जोरदार झटक्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

पळासखेडे (ता. भडगाव) येथील किशोर शिवाजी पाटील (वय ४५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ३१ मार्चला (Bhadgaon) पळासखेडे-तळवाडे रस्त्यावर किशोर पाटील हे मृतावस्थेत आढळले. त्यांचा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाजानुसार भडगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद (Crime News) झाली. मात्र, मृतदेहाच्या पंचनाम्यावेळेस हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी प्रथम किशोर पाटील याच्या वडिलांना विचारपूस केली असता किशोर आणि त्याच्या पत्नीत पैशांच्या देण्याघेण्यावरून वाद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांना किशोरच्या पत्नीवर शंका आली

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhadgaon Crime News
Bribe Case : बिल काढून देण्यासाठी १५ हजाराची लाच; कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

असा रचला कट 

दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज (रा. आळंदी जि.पुणे) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते. दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपविण्याचे पुष्पा पाटीलने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले. प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावले. त्यानुसार किशोर पाटील हा ३० मार्चला सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघून गेला. त्यानुसार अगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके यांने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलीसांनी पत्नी पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com