Bribe Case : बिल काढून देण्यासाठी १५ हजाराची लाच; कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Latur News : लातूरच्या अहमदपूर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारा बळीराम सोनकांबळे व पंडित शेकडे या दोघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे
Bribe Case
Bribe CaseSaam tv

संदीप भोसले
लातूर
: गावात कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनी व नळ योजनेच्या थकीत बिलाची रक्कम (Latur) काढून देण्यासाठी लाचेची मागणी केली. १५ हजाराची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने कनिष्ठ अभियंत्यासह एकास ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Bribe Case
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचं ठरलं; लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करणार

लातूरच्या अहमदपूर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारा बळीराम सोनकांबळे व पंडित शेकडे या दोघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पाटबंधारे विभागातील या दोघांनी गावात केलेल्या जलवाहिनी व नळ योजनेच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी १५ हजार रुपयाची (Bribe) लाच तक्रारदाराकडे मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Case
Palghar Water Crisis : पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; धरणांत ४० टक्केच साठा

लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. यात तथ्य आढळून आल्यानंतर पथकाने सापळा रचला. दरम्यान १५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले आहे. तर अहमदपूर पोलीस (Police) ठाण्यात या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com