Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचं ठरलं; लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करणार

Ravikant Tupkar News : अर्ज सादर करण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अपक्ष म्हणून नाही तर वंचित, बहुजन, भूमिहीन, शेतकरी यांचा उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Saam TV
Published On

संजय जाधव

Buldhana :

मी अपक्ष नाही तर वंचित , बहुजन, भूमिहीन, शेतकरी यांचा उमेदवार आहे. आज मी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी जिल्हाभरातून हजारो शेतकरी बांधव स्वयंफूर्तीने उपस्थित राहणार आहेत, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.

Ravikant Tupkar
Buldhana News: अज्ञात वाहनाची कारला धडक, डॉक्टर मुलासह आईचा जागीच मृत्यू

राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अशात आज शेतकरी नेते रविकांत तुपकर आपला नामांकन अर्ज सादर करत आहेत. अर्ज सादर करण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अपक्ष म्हणून नाही तर वंचित, बहुजन, भूमिहीन, शेतकरी यांचा उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

महायुतीच्या उमेदवारांना रॅलीसाठी लोक मजुरीने आणावे लागणार आहेत. त्यासाठी दररोज मटण दारू चिकन दाभ्यावरील पार्ट्या असं द्यावं लागत आहे, अशा शब्दांत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांवर आरोप करत निशाणा साधला आहे.

तुम्हाला खासदारकी मिळाली त्यासाठी वर्षाकाठी 5, 10 कोटी मिळाले तर कुठे खर्च केले. एक नाली व सभागृह बांधले म्हणजे विकास झाला का? काय विकास केला त्यांनी, अशी टीका देखील तुपकरांनी यावेळी केली.

आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, देशात दोन नंबरचा बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्या म्हणून ओळखला जातोय. सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही या खासदारचा जिल्ह्यात संपर्क तरी आहे का? प्रचंड नाराजी आहे. जिल्ह्यातील सर्व विकास आराखडे रखडले आहेत, असं म्हणत तुपकरांनी रखडलेल्या कामांचा पाढाच वाचला.

फक्त पैशाच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नसतात. भानगड अशी झाली की, माझ्या उमेदवारीमुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता ही निवडणूक जनतेची आहे आणी जनता माझाच विचार करणार असून माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलाय.

Ravikant Tupkar
Crime News: उत्तराखंडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडांची पुनरावृत्ती; लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून जंगलात फेकला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com