Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेचा भाजपमध्ये प्रवेश

Archana Patil Chakurkar News : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा खरी ठरली आहे.
Latur Politics
Latur PoliticsSaam tv
Published On

Latur political News :

लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा खरी ठरली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी काही काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचं नाव आघाडीवर होतं.

Latur Politics
Maval Lok Sabha: शिंदे गटाचं टेन्शन मिटलं, मावळ लोकसभेसाठी महायुतीची एकजूट; श्रीरंग बारणे हॅट्ट्रिक करणार का?

काल डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज शनिवारी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

Latur Politics
vanchit Bahujan Aghadi : नाशिक, दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं, 'वंचित' लोकसभा लढवणार

दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजी पाटील चाकूरकर यांचे पूत्र माजी आमदार बसवराज पाटील यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अशोक चव्हाण यांच्याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रात लोकसभेदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडताना दिसत आहे. याआधी देखील काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे.

Latur Politics
Ambadas Danve: मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, ठाकरेंसोबतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

तत्पूर्वी , काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाची साथ सोडली आहे. या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com