Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

Dhule Shirpur News : शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना इंदूरकडून धुळे शहराच्या दिशेने पिकअप वाहनमधून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली
Shirpur Police
Shirpur PoliceSaam tv

शिरपूर (धुळे) : दारू विक्री व वाहतुकीस बंदी असताना सर्रासपणे दारूची अवैधरित्या वाहतूक केली जाते. (Shirpur) अशा प्रकारे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिकअपमधून वाहतूक केली जात असलेली पावणेतीन लाख रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा पोलिसांनी (Police) जप्त केला. (Breaking Marathi News)

Shirpur Police
Bhadgaon Crime News : प्रियकराच्या मदतीने पत्नीचे भयानक कृत्य; पतीच्या अपघाताचा केला बनाव

शिरपूर शहर पोलिस (Shirpur Police) ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना इंदूरकडून धुळे (Dhule) शहराच्या दिशेने पिकअप वाहनमधून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून शोध पथकाच्या अंमलदारांनी शिरपूर टोलनाका येथे सापळा रचला. दरम्यान संशयित वाहनाला थांबविण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने भरधाव पिकअप पळविली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत (tapi River) तापी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर गाडीचे टायर फुटल्याने त्याने कच्च्या रस्त्यावर वाहन उतरविले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirpur Police
Wardha News : वर्धेत निवडणुक विभागाच्या कामावरील गाडीवर कमळाचे चिन्ह; ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार

काही अंतरावर वाहन उभे करून तो पळून गेला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कांद्यांच्या गोण्यांच्या आडोशाला १०० खोक्यांमध्ये भरलेले दारूचे अर्धा लिटरचे टिन आढळले. वाहनासह या मुद्देमालाची एकूण किंमत सात लाख ८८ हजार रुपये आहे. पोलिसांनी संशयित चालकाविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com