Latur Election Commission दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur: नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी लावला मेळ; नवीन मतदार यादीत मोठा घोळ

मतदार यादीचा मॅनेज कार्यक्रम- राष्ट्रवादीची चौकशी व कारवाईची मागणी - अफसर शेख

दीपक क्षीरसागर

लातूर - प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात निवडणूक हे एक युद्धच आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी गावखेड्यातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटलांची नावे मतदार यादीत आहे याची कुणकुण लागताच संबंधितांचे धाबे दणाणले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) डॉ. अफसर शेख यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि निवडणूक (Election) आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली आहे.

आगामी काही दिवसांनी नगरपालिकाच्या निवडणुका होत आहे. अनेक इच्छुक भावी उमेदवारांनी आपणच निवडून यावं यासाठी उत्तमपणे मेळ बसवला. औसा तालुक्यातील गावखेड्यातील सगेसोयरे मित्रपरिवार यांची नावे नवीन मतदार यादीत घालून जिंकण्यासाठी आवश्यक मतांची सोय केली.

औसा शहरातील भाग क्रमांक 44 मध्ये हासेगाव तालुका औसा तालुक्यातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्य व विद्यमान पोलीस पाटील यांची नावे बोगसपणे लावले तसेच शहरातील भाग क्रमांक 41, 42, 43, 44 मधील बोगस नावांची नोंद केली. ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या लक्षात आली असता सदरील कामाची चौकशी करून नावे वगळण्यात यावी अशी मागणी करत सदरचा प्रकार हा मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमा दरम्यान केला आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी केला आहे.

हे देखील पहा -

नजीकच्या काळात औसा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला होता. यामध्ये अनेक नावे वरील भागामध्ये लावण्यात आलेली आहेत. शहरातील प्रभाग क्र 2, 3 व 4 मध्ये अनेक जणांची नावे बोगस पद्धतीने नोंद घेण्यात आलेली आहे. मुळात ही व्यक्ती औसा शहराचे रहिवासी नाहीत व ते औसा शहरात राहत असल्याचे नसून हे दोन्ही व्यक्ती आपल्या पदाचा दुरुपयोग करत व निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची संगणमत करून आपले नाव औसा शहराच्या मतदार यादीत नोंदविलेली आहेत.

सदर ग्रामपंचायत सदस्य यांना सदस्य पदावर अपात्र ठरवण्यासाठी शिफारस करण्यात यावी आणि सदरचे त्यांचे वर्तन हे त्यांच्या पदासाठी अशोभनीय वर्तन असल्याचे घोषित करावे तसेच पोलीस पाटील यांना या पदावरून मुक्त करण्यासाठी शिफारस वजा आदेश निर्गमित व्हावेत याप्रकरणी त्यांची नावे औसा शहराच्या भाग क्रमांक 44 च्या यादीत नोंदवली असल्याबाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व शहरातील इतर भाग क्रमांक 41, 42, 43, 44 मध्ये बोगस पद्धतीने नवीन नावे नोंदविण्यात आलेली आहे.

तसेच वरील बाबतीत हरकत घेण्यासाठी ही आम्हास वारंवार मागणी करूनही तहसील कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद अथवा मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही वरील प्रकरणी आम्हास न्याय द्यावा व औसा नगर परिषदेच्या निष्पक्ष, कायदेशीर, पारदर्शक व न्यायपद्धती निवडणूक पार होतील याची दक्षता घ्यावी अशी मागणी डॉ अफसर शेख यांनी केली आहे.

दरम्यान, मतदार यादीत नाव नोंदविण्याची एक प्रक्रिया असते. ज्या शहरात अथवा गावात नाव नोंदवायचे आहे. तेथला त्या मतदाराचा रहिवास, घर अथवा तो किती वर्षांपासून शहरात राहत आहे. याचा लेखी व पटण्याजोगा पुरावा सादर केल्यावर मूळ ठिकाणच्या मतदारयादीतील त्याचे नाव कमी करून नवीन ठिकाणच्या यादीत त्या मतदाराचे नाव नोंदविले जाते. आता या प्रकरणात निवडणूक विभागाने नेमकी कुठली कागदपत्रे बघून यांना शहराच्या मतदार यादीत स्थान दिले? हे न उलगडणारे कोडे आहे? यात जर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही काळेबेरे केले असेल प्रथम त्यांच्यावर राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणीही डॉ. अफसर शेख यांनी केली आहे.

याबाबत नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी औसा येथील तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली असून या प्रकारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. ज्या नावांना आक्षेप घेतला आहे त्या संबंधित व्यक्तीला नोटीस बजावली जाणार असून त्याचे म्हणणे ऐकून घेऊन संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारावाई केली जाणार असल्याचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT