अंबरनाथ - तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेले गावठी दारू निर्मितीचे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) उध्वस्त केले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल सुद्धा नष्ट करण्यात आला आहे. अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील माणेरे आणि द्वारली गावात गावठी दारूची निर्मिती करणारे अड्डे सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या ठिकाणी धाड टाकत हे हातभट्टी दारू चे अड्डे उध्वस्त केले. (Ambernath Latest News)
हे देखील पहा -
या ठिकाणी असलेल्या तब्बल 9 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पदन शुल्क विभागाने नष्ट केला आहे. तर यावेळी अड्ड्यांवर दारू बनवणारे पाच जण पळून गेले असून या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.