Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून; २८ गावांचा संपर्क तुटला

Latur News : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भात तर पावसाने हाहाकार माजवला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूर जिल्ह्यात देखील पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरू नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्या आहे. यामुळे पुलावरून असलेली वाहतूक बंद झाल्याने जवळपास २८ गावांचा संपर्क तुटला आहे. नवीन पुलाचे काम मंजूर असूनही काम झाले नसल्याने तीरु नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. 

राज्यातील अनेक भागात (Heavy Rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भात तर पावसाने हाहाकार माजवला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यानुसार लातूर (Latur) जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. प्रामुख्याने जळकोट तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरु नदीला पाण्याचा प्रवाह अधिक वाढल्याने नदीवर तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. 

तिरू नदीला पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुल वाहून गेला आहे. यामुळे अतनूर गावासह जवळपास २८ गावांचा संपर्क तुटला आहे. एक वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्याने नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली. मात्र पुल मजबूत आणि टिकावू नसल्याने पुल वाहून गेला आहे. जवळपास नदीच्या पलीकडील गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, गुंजी, नळगीर, उदगीर, जळकोट, बाराहाळी, मुखेड या गावांचा संपर्क तुटला आहे. नदीतील पाणी कमी झाल्यानंतर वाहतुकीसाठी रस्त्याचे काम करण्यात येईल; अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

SCROLL FOR NEXT