Latur Farmer Suicide दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur: शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच; कर्जाला कंटाळून शेतातच घेतला गळफास

Latur Farmer News : मयत संतोष पाटील यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १ लाख ९७ हजार कर्ज आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. एकीकडे दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लातूर (Latur) जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील मसलगा (खु) येथे कर्जबाजारीपणातून एका शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी किल्लारी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latur Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील मसलगा (खु) येथील शेतकरी संतोष भाऊराव पाटील यांनी स्वतः च्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. मयत शेतकरी संतोष पाटील यांच्या कुटुंबात १ हेक्टर ३२ आर. जमीन असून याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत संतोष पाटील यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १ लाख ९७ हजार कर्ज आहे. तसेच अन्य बँकेचेही कर्ज असल्याने या कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. संतोष पाटील यांच्या मृतदेहाचे बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी बाळासाहेब पाटील यांच्या माहितीवरून किल्लारी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT