Shocking Incident in Latur Saam Tv
महाराष्ट्र

Latur Crime: नारळाच्या वाटणीवरून वाद, मित्रानेच मित्राला संपवलं; लातूरमध्ये नेमकं काय घडलं?

Shocking Incident in Latur: नारळाच्या वाटणीवरून लातूरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या घटनेत १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Priya More

संदीप भोसले, लातूर

मैत्रीचं नातं खूपच भारी असतं. जीवाला जीव देणारे मित्रांबद्दल आपण बऱ्याचदा ऐकले आहे. पण अनेकदा याच मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना देखील घडतात. मित्रच मित्राचा घात करतो अशीच एक घटना लातूरमध्ये घडली आहे.

नारळाच्या वाटणीवरून वाद झाल्याने मित्रानेच आपल्या जीवलग मित्राची हत्या केली. या घटनेत १४ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. लातूरच्या उजनी कमलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणा भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या औसा तालुक्यातल्या उजनी कमलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील नारळ तोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मित्रांमध्ये नारळाच्या वाटणीवरून वाद झाला. या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. यात रितेश गिरी या १४ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत रितेश गिरी हा आठवीमध्ये शिकत होता.

रितेश आपल्या मित्रासोबत गावाशेजारी असणाऱ्या नारळाच्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी गेले होते. नारळ तोडल्यानंतर वाटणी करत असताना रितेश आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला. यावेळी रितेशची हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीने हा सगळा प्रकार झाल्यानंतर मृतदेह तुरीच्या गुळ्यात लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

रितेश बराच वेळ घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांना गावाच्या बाहेर तुरीच्या गुळ्यात रितेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. रितेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटंबीयांना मोठा धक्का बसला. रितेशच्या हत्येनंतर कमलापूर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तर याप्रकरणी आता भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT