Police investigate the shocking fake death and insurance fraud case in Latur’s Ausa taluka. saam tv
महाराष्ट्र

Shocking: मेलेला माणूस जिवंत झाला; पोलीस तपासात समोर आलं चक्रावून टाकणारं सत्य

Youth Fakes Death For Insurance : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका तरुणाने विम्याच्या पैशासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला होता. पोलिसांच्या तपासात जळालेल्या मृतदेहाच्या गूढतेमागील धक्कादायक सत्य उघड झाले.

Bharat Jadhav

  • लातूरच्या औसा तालुक्यात विमा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

  • तरुणाने विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला.

  • कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचं नाटक करण्यात आलं होतं.

संदीप भोसले, साम प्रतिनिधी

लातूरच्या औसा तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडलीय. विम्याच्या पैशासाठी एका तरुणाने मृत्यूचा बनाव केल्याची घटना घडलीय. एका करमध्ये एका तरुणाचा जळून मृत्यू झाल्याची घटना औसा तालुक्यातील वानवाडा शिवारात घडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या पोलीस तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं.

गणेश चव्हाण असं आपल्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. गणेशनं विम्यांचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याच मृत्यूचा बनाव केला होता. मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून गणेशनं आपल्याच मृत्यूचा बनाव केला. औसा तालुक्यातील वानवाडा शिवारात कारमध्ये एकाला पोत्यात बांधून गाडीसहित जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला होता. त्यांच्या तपासात गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक व आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तसेच एक कोटीच्या इन्शुरन्स लाभापाई स्वतः मेल्याचा खोटा प्रसंग रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 24 तासाच्या आत स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या गणेश चव्हाण याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशीत त्याने मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली दिली. या प्रकरणी हत्या ,फसवणूक, खोटी माहिती देणे व पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT