Crime News In Marathi Saamtv
महाराष्ट्र

Latur Crime: चोरट्यांच भलतं धाडस! उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीसांसह ६ अधिकाऱ्यांची घरे फोडली; लातुरात खळबळ

Crime News In Marathi: उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस यांच्यासह ६ अधिकाऱ्यांचं घर फोडल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. या घरफोड्यांमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. ११ डिसेंबर २०२३

Latur Crime News:

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस यांच्यासह ६ अधिकाऱ्यांचं घर फोडल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. या घरफोड्यांमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचेच घर फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूरमध्ये (Latur) चाकूर तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांमध्ये उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सहा अधिकाऱ्यांच्या घरे फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी रोख रकमेसह साडे चार लाख रूपये चोरट्यांनी पळविले आहेत.

तहसील कार्यालयाजवळ असलेल्या या शासकीय निवासस्थानात अनेक विभागाचे जवळपास 40 अधिकारी व कर्मचारी निवासी राहतात. मात्र शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांची सुट्टी आल्यामुळे अनेकजण कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शासकीय निवासस्थानात प्रवेश करत हात साफ केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळी कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांच्याच घरी चोरी झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केल जात आहे. चोरांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकरणाची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RSS ला १०० वर्षे पूर्ण, PM मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि स्मारक नाणं जारी; काय आहे वैशिष्ट्ये?

Dussehra Marathi Wishes: दसरा आणि विजयादशमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा आणि मेसेजेस

Mumbai To Pawna Lake: वीकेंडसाठी प्लॅन करताय? मुंबईवरून पावना लेकला कसे पोहोचाल? वाचा सविस्तर माहिती आणि पर्याय

Nalasopara : नालासोपाऱ्यात शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग | VIDEO

Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT