Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News : खळबळजनक! लातूरमध्ये 'एक दूजे के लिये'; विहिरीत आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह

गातेगाव आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Latur Crime News : लातूरमधून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत आढळून आलेत. मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शुक्रवारी आढळला. तर मुलाचा मृतदेह शनिवारी पोलिसांनी शोधून काढला. तो विहिरीतील गाळात अडकला होता. याबाबत गातेगाव आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Latest Latur Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरानजीक असलेल्या वसवाडी परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. ती इयत्ता १० वीमध्ये लातुरमधील एका शाळेत शिक्षण घेत होती. तर मृत मुलगा मूळचा केज तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

मुलगी १५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शाळेला जाते असं सांगून घराबाहेर पडली. रोज दुपारी १ वाजता ती घरी येत असे. मात्र १५ तारखेला ती घराकडे परतलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी तिला सर्वत्र शोधलं. मात्र ती कुठेही सापडली नाही.

कुटुंबियांची चिंता वाढू लागली त्यामुळे त्यांनी,याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी ४च्या सुमारास चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याने गावात एकच चर्चा सुरू झाली.

शिवाय, विहिरीच्या काठावर मुलाची चप्पल मिळाली. पोलिसांनी संशय व्यक्त करत विहिरीत मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र शुक्रवारी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे शनिवार सकाळपासूनच पुन्हा शोध मोहीम सुरू केली. अखेर सायंकाळी ५ वाजता मुलाचाही मृतदेह पोलिसांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. असे गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर कांबळे म्हणाले.

नुकताच व्हेलेंटाईन डे सर्वत्र साजरा झाला. त्यानंतर ५ दिवसांनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेनं गावकरी चिंतेत आहेत. तसेच मुलगा आणि मुलीच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

SCROLL FOR NEXT